Psalms 36

प्रमुख गायकासाठी; परमेश्वराचा सेवक दावीद याचे स्तोत्र.

1दुष्टाचा अपराध त्याच्या हृदयात सांगत असतो की,
त्याच्या दृष्टीत देवाचे काही भय नाही.
2त्याचे अपराध उघडकीस येणार नाही आणि त्याचा द्वेष केला जाणार नाही,
कारण अशा भ्रमात तो राहत असतो.

3त्याचे शब्द कपटी आणि पापमय असतात.

तो शहाणा होण्यास किंवा सत्कृत्ये करण्यास इच्छीत नाही.
4तो अापल्या बिछान्यावर पडून असता, तो अपराधाच्या योजना आखतो.
तो वाईट मार्गाच्या योजना करतो,
तो वाईटाचा धिक्कार करत नाही.

5हे परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे;

तुझी एकनिष्ठता आभाळापर्यंत पोहचली आहे.
6परमेश्वरा तुझे न्यायीपणा उंच पर्वतासारखे आहे.
तुझा न्याय खोल समुद्रासारखा आहे.
परमेश्वरा तू मनुष्यास आणि प्राण्यांस दोघांस राखतो.

7देवा! तुझी प्रेमदया किती मौल्यवान आहे.

मानवजात तुझ्या पंखांच्या सावलित आश्रय घेते.
8ते तुझ्या घरातल्या समृद्धीमुळे ते तृप्त होतील.
तू आपल्या बहुमोल नदीतून त्यांना मनसोत्क पिण्यास देशील.
9कारण जीवनाचा झरा तुझ्याजवळ आहे.
तुझ्या प्रकाशात आम्ही प्रकाश पाहू.

10राजे तुला ओळखतात त्यांच्याकरिता तू आपली प्रेमदया विस्तीर्ण कर,

तुझी सुरक्षीतता सरळांसोबत असू दे.
11गर्विष्ठांचे पाय माझ्याजवळ येऊ देऊ नकोस.
दुष्टाचा हात मला घालवून न देवो.
तेथे दुष्ट पडले आहेत,
ते पाडले गेले आहेत आणि ते कधीही उभे राहू शकणार नाहीत.
12

Copyright information for MarULB